Maruti Stotra Marathi PDF Free Download

From Here, You can download the Maruti Stotra Marathi PDF for free by following the download button given below the PDF cover image.
Download
0/5 Votes: 0
Size
159 KB
Report this app

Description

Maruti Stotra Marathi PDF: Here we will share the complete श्री मारुती स्त्रोत्र, in PDF format, which you can download for free using the direct download link given below in this same article.

Maruti Stotra Marathi PDF Overview

PDF NameMaruti Stotra Marathi PDF
LanguageMarathi
PDF Size159 KB
No. of Pages2
SourcePublic Domain
QualityReadable
CategoryReligious

Maruti Stotra Marathi PDF Summary

मारुती स्तोत्र हे हनुमानाला समर्पित स्तोत्र आहे. जर तुम्ही देखील बजरंगबलीचे भक्त असाल तर मारुती स्तोत्राचे पठण तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते, कारण या स्तोत्राचे पठण केल्याने बजरंगबली प्रसन्न होतो आणि आशीर्वाद देतो.

मंगळवारी या स्तोत्राचे पठण करणे अत्यंत शुभ मानले जाते कारण मंगळवार हा हनुमानाचा दिवस मानला जातो आणि मंगळवारी हनुमानाची पूजा केली जाते.

भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती |
वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१||

महाबळी प्राणदाता, सकळां उठवी बळें |
सौख्यकारी दुःखहारी, दुत वैष्णव गायका ||२||

दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदांतरा |
पाताळदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||३||

लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना |
पुण्यवंता पुण्यशीला, पावना परितोषका ||४||

ध्वजांगे उचली बाहो, आवेशें लोटला पुढें |
काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||५||

ब्रह्मांडे माईलें नेणों, आवळे दंतपंगती |
नेत्राग्नीं चालिल्या ज्वाळा, भ्रुकुटी ताठिल्या बळें ||६||

पुच्छ ते मुरडिले माथा, किरीटी कुंडले बरीं |
सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ||७||

ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू |
चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||८||

कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे |
मंद्राद्रीसारिखा द्रोणू, क्रोधें उत्पाटिला बळें ||९||

आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती |
मनासी टाकिलें मागें, गतीसी तुळणा नसे ||१०||

अणुपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे |
तयासी तुळणा कोठे, मेरू मंदार धाकुटे ||११||

ब्रह्मांडाभोवतें वेढें, वज्रपुच्छें करू शकें |
तयासी तुळणा कैची, ब्रह्मांडी पाहता नसे ||१२||

आरक्त देखिलें डोळा, ग्रासिलें सूर्यमंडळा |
वाढतां वाढतां वाढें, भेदिलें शून्यमंडळा ||१३||

धनधान्य पशूवृद्धि, पुत्रपौत्र समग्रही |
पावती रूपविद्यादी, स्तोत्रपाठें करूनियां ||१४||

भूतप्रेतसमंधादी, रोगव्याधी समस्तही |
नासती तूटती चिंता, आनंदे भीमदर्शनें ||१५||

हे धरा पंधरा श्लोकी, लाभली शोभली बरी |
दृढदेहो निसंदेहो, संख्या चन्द्रकळागुणें ||१६||

रामदासी अग्रगण्यू, कपिकुळासि मंडणू |
रामरूपी अंतरात्मा, दर्शनें दोष नासती ||१७||

॥ इति श्रीरामदासकृतं संकटनिरसनं मारुतिस्तोत्रं संपूर्णम् ।।

For Complete Maruti Stotra In Marathi, please download the pdf for free.

Related PDF-

Tulsi Aarti Marathi PDF (श्री तुळशीची आरती) Free Download

Venkatesh Stotra In Marathi PDF Free Download

Christmas Message in Telugu PDF Free Download

Bangla Calendar 2024 PDF Free Download

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *